अहमदनगर दक्षिण

पाथर्डीतील ज्योती गायके खून प्रकरण…२ वर्षांनंतरही पीडित कुटुंबीयांना न्याय मिळेना

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- सर्जेराव गणपत गायके यांची पत्नी मयत ज्योती गायके याचा गळा दाबून खून करण्यात आला व आरोपींनी अपघाताचा बनाव केला असून सदरील आरोपींवर 302 व 201, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे गायके कुटुंबीयांनी निवेदन देण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी कि मयत ज्योती सर्जेराव गायके यांचा सदर आरोपींनी अपघाताचा बनाव केला व पोस्टमार्टम करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात आणले असता तेथील डॉक्टरांचे अहवाल आल्यानंतर सदरील घटना लक्षात आली.

गायके हिचा गळा दाबून खून करण्यात आला असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या रिपोर्टमध्ये आले. या खुनाचा तपास सीआयडी कडे वर्ग करावा तसेच या प्रकरणातील आरोपी यांच्यावर 302 व 301 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी तसेच या प्रकरणातील संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांनी तपासात दिरंगाईबाबत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयानी केली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office