अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :- गुजरात मधील दोन लोकांनी गुजरात मॉडेलच्या नावावर देशाची दिशाभूल करीत आहेत. आपल्याला नगर पंचायत आपल्या विचाराची असेल तर लवकरच देशही आपल्या विचाराचे होईल.(Hardik Patel)
एका नवनिर्माणाच्या स्वप्नाची सुरुवात या मतदारसंघात आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातुन होईल, असे प्रतिपादन गुजरात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी केले.
कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत हार्दिक पटेल हे बोलत होते.यावेळी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे,
आमदार रोहित पवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र,फाळके,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके,प्रवीण घुले,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील आदी.
उपस्थित होते. हार्दिक पटेल म्हणाले, यापूर्वीच्या लोकप्रतिनिधीने या मतदारसंघात काही न केल्याने रोहित पवार या मतदारसंघात आले आणि आपण या ठिकाणी त्यांना निवडून देऊन विकासाचे पर्व निर्माण केले आहे.
तेच पवार एक विकासाचे स्वप्न निर्माण करतील. मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, आमदार झाल्यानंतर दोन वर्षात रोहित पवार यांनी वीस वर्षाचा विकासाचा अनुशेष भरून काढला आहे.
नगरपंचायत निवडणूक ही सामान्य कार्यकर्त्यांची या निवडणुकीमुळे मोठ्या निवडणुकांमध्ये पक्ष मोठा होत असतो. आमदार पवार यांनी माझ्याकडे सर्वाधिक निधीची मागणी केली आहे.
विकासाच्या बाबतीत पुढील तीन वर्षांमध्ये कर्जत- जामखेड मतदार संघ दिल्ली पर्यंत पोहोचेल. विकासाचा शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आणि आमदार रोहित पवार यांची आहे.
आमदार पवार म्हणाले, विकासाच्या मुद्द्यावर जर बोलायचं असेल तर मी केव्हाही समोर यायला तयार आहे, असे आव्हान त्यांनी माजी मंत्री राम शिंदे यांना दिले. भाजपकडे विकासाचा कोणताही मुद्दा नाही त्यामुळे ते खालच्या पातळीवर जाऊन आरोप करीत आहेत.