कर्जत

Ahmednagar Politics : आ. रोहित पवार देशद्रोही निरव मोदीच्या जागेसाठी लढतायेत !

Published by
Ahmednagarlive24 Office

कर्जत-जामखेड येथील पाटेगाव व खंडाळा परिसरातील नियोजित एमआयडीसीवरून चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे. अगदी प्रस्तावित झालेली व अवघ्या काही पावलांवर असणारी एमआयडीसी पुन्हा जागेच्या वादात अडकली.

आ. रोहित पवार यांनी ज्या जागेवर एमआयडीसीसाठी प्रयत्न केले आ. राम शिंदे यांनी ती एमआयडीसी आता दुसऱ्या जागेवर नेण्यासाठी फेरप्रस्ताव पाठवला आहे. यावरून आ. राम शिंदे व आ. रोहित पवार यांच्यामध्ये चांगलीच आरोप प्रत्यारोपांची लढाई सुरु झाली आहे.

आ. पवार काय करतायेत आरोप ?

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या एमआयडीसीच्या प्रस्तावित जागेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर राजकीय दबाव आणला जातोय असा आरोप केला.

तसेच ज्यांनी एमआयडीसी जागेबाबत स्थगिती आणली त्यांनी आपल्या कार्यकाळात मातदारसंघात साधे उसाचे गुऱ्हाळ तरी सुरु केला का? असा खणखणीत आरोप केला होता. राजकारण मध्ये आणून विनाकारण तरुणांचे नुकसान करू नका असा घणाघात आ.पवार यांनी केला होता.

शिंदे यांचा कायचे आरोप?

आमदार प्रा. शिंदे म्हणाले प्रस्तावित एमआयडीसीत निरव मोदीची जमीन असल्याने या जागेसाठी त्यांचा आग्रह का आहे? असा सवाल केला. तसेच ते म्हणाले, मी बेरोजगारांसाठी लढत आहे.

कर्जत-जामखेड एमआयडीसीसाठी नव्याने जमिनीचा फेर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत व त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. मी तर तालुक्यातील बेरोजगार युवकांसाठी लढतोय पण आ. पवार हे देशद्रोही निरव मोदीच्या जागेसाठी लढत असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office