अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :- पाणी फाउंडेशन अंतर्गत पारनेर तालुक्यातील समृद्ध गाव स्पर्धेतील गावांमध्ये रब्बी हंगामच्या नियोजनासाठी विहिरीतील पाणी पातळीचे मोजमाप सुरू केले आहे.
पडलेल्या पावसाचे मोजमाप करून उपलब्ध पाण्याचे हंगाम व पिकासाठी नियोजन करता यावे म्हणून आता पाणी फाउंडेशनचे जलदूत निवडलेल्या गावातील विहिरीच्या पाण्याचे मोजमाप करत आहेत .
समृद्ध गाव स्पर्धेतील रब्बी हंगामाचे नियोजन करण्यासाठी विहिरीच्या पातळीचे मोजमाप अतिशय महत्त्वाचे असते. यासाठी पाणी फाउंडेशनकडून गावागावांत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला.
प्रशिक्षण घेतलेले जलमित्र गावातील निवडक विहिरींचे मोजमाप करीत आहेत. मिनी स्पर्धा टप्पा दोनसाठी रब्बी पिकाचे नियोजन महत्त्वाचे असून.
गावात किती मिलिमीटर पाऊस पडला त्यानुसार उपलब्ध पाण्यावर पिकाचे नियोजन गावांना करायचे आहे त्यासाठी विहिरीमध्ये सर्वोच्च पाण्याची पातळी, सध्याची पाण्याची पातळी, विहिरीची खोली इत्यादी मोजमाप गावागावांत सुरू आहे.
पाणी फाउंडेशनच्या वतीने जलसंधारणाचे विविध उपक्रम राबवले जातात. माथा ते बांधा पाणी अडवणे पाणी जिरवणे. गावातील पाणी गावातच अडवणे.
पाणीदार गाव योजना असे म्हत्वाचे उपक्रम हाती घेतले जातात. आतापर्यंत नांदूर पठार, पिंपरी पठार, डोंगरवाडी, पिंपरी जलसेन,
कळमकरवाडी, सुलतानपूर, कर्जुले हर्या, पुणेवाडी या गावांनी विहीर मोजमाप केले असून स्पर्धेतील इतरही गावे लवकरच नियोजन करत आहेत.