अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- राजकारण म्हंटले कि आरोप – प्रत्यारोप हे होणारच. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एखाद्या मुद्द्यावरून चांगलीच चिखलफेक झाल्याचे देखील पाहायला मिळते.
नुकतेच राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या काही विरोधकांना चांगलाच दम भरलेला इशारा दिलेला आहे. राजकारणात आम्ही कटकारस्थाने ऐवजी लोकांची कामे करण्यावर भर देतो.
मात्र, काहीजण पराभवाच्या नैराश्यातून अजून बाहेर पडलेले दिसत नाहीत. म्हणुनच आपल्या राजकारणाला अडचण ठरणार्या निष्पाप कार्यकर्त्यांना विनाकारण खोट्या पोलीस केसेसमध्ये अडकवण्याचे विषारी राजकारण करत आहेत.
पण याद राखा आमच्या कार्यकर्त्यांना विनाकारण अडकवण्याचा प्रयत्न केला, तर हा कुटील डाव तुमच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कोणाचेही नाव न घेता दिला.
दरम्यान तनपुरे यांच्या टिकेचा रोख हा माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्याकडेच होता अशी चर्चा कार्यक्रम स्थळी झाली. नगर तालुक्यातील नागरदेवळे येथे आयोजित कार्यक्रमात राज्यमंत्री तनपुरे बोलत होते.
शनिवारी नगर तालुक्यातील शिवसेना नेते व राज्यमंत्री तनपुरे यांचे समर्थक गोविंद मोकाटे यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला.
त्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री तनपुरे यांनी सूचक विधान करत नाव न घेता टीका केली.