अहमदनगर दक्षिण

आमदार संग्राम जगताप म्हणाले प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावतोय

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- शहरातील प्रत्येक नागरिकांला शहरा बद्दल आपुलकी असावी या माध्यमातून आपले शहराशी नाते निर्माण होते. शहर विकासासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करावे नगर शहर ही आपली एक कर्मभूमी आहे.

काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी नगर शहराला नावे ठेऊन शहराची बदनामी करत असतात. परंतु आम्ही शहर विकासाचे एक-एक प्रश्न हाती घेऊन कायमस्वरूपी मार्गी लावत आहे.

येत्या काही दिवसांमध्ये शहरातील विकासाचे एक-एक प्रश्न कमी होऊन प्रश्न मुक्तीकडे वाटचाल करत आहे. विकसित शहर म्हणून नगर शहराची ओळख निर्माण करायची आहे.

पूर्वी नगरसेवक लाईट, कचरा, पाणी या प्रश्नांमध्ये अडकून पडत होते आता हे सर्व प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागल्यामुळे त्यांना इतर विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी वेळ भेटणार आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

प्रभाग क्रमांक १४ मध्ये आनंद कॉलनी येथे रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी नगरसेवक प्रकाश भागानगरे, माजी नगरसेवक संजय चोपडा, ईश्वर मुनोत, मदनलाल धाडीवाल, नंदूभाऊ मुथा, शिरीष चंगेडिया, राजेंद्र गुजर, सुरेश कटारिया, सुनील छाजेड, सचिन भांडरी, सिद्धांत मंडलेच, भावना छाजेड,

आशाताई मुनोत, लताताई गुजर, सुनीता भांडरी यांच्यासह प्रभागातील नागरिक व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे

Ahmednagarlive24 Office