अहमदनगर दक्षिण

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रोहित पवारांवर सोपवली मोठी जबाबदारी

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- राज्यात निवडणुकांच्या अनुषंगाने पक्ष बळकटीकरणासाठी पक्षातील नेत्यांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. यातच विशेष बाब म्हणजे यंदाच्या निवडणुकीमध्ये तरुण चेहरे हे निवडणुकांचे नेतृत्व करतील असे दिसून येऊ लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रोहित पवार यांच्यावर राज्य पातळीवरील एक मोठी जबाबदारी दिली आहे. त्याबाबत खुद्द रोहित पवार यांनीच ट्वीट करुन माहिती दिली आहे.

दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. या निवडणुकीत राष्ट्रवादीची रणनिती ठरवण्यासाठी आमदार रोहित पवारयांची मोठी भूमिका राहिली.

कर्जत नगर पंचायत निवडणुकीतही रोहित पवारांनी माजी मंत्री आणि भाजप नेते राम शिंदे यांना मोठा झटका दिला. या पार्श्वभूमीवर आता शरद पवार यांनी आमदार रोहित यांच्यावर राज्य पातळीवरील एक मोठी जबाबदारी दिली आहे.

शरद पवार यांच्या सुचनेनुसार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रोहित पवार यांच्यावर भूम-परंडा, उस्मानाबाद, करमाळा, श्रीगोंदा आणि पंढरपूर या पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी रोहित पवार यांच्या खांद्यावर दिली आहे.

रोहित पवार यांनी ट्वीट करुन दिली माहिती ‘आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सूचनेनुसार प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी भूम-परांडा, उस्मानाबाद, करमाळा, श्रीगोंदा व पंढरपूर या पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर सोपवलीय.

पक्षादेशानुसार आगामी काळात या मतदारसंघात संघटन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नवे-जुने पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या सहकार्याने कामाच्या माध्यमातून लोकांचा विश्वास संपादन केला जाईल

आणि या विश्वासाच्या बळावरच आगामी सर्व निवडणुकीत या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल, असा विश्वास आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office