परजणे, काळेंच्या विनापरवाना प्रचार करणाऱ्या गाड्यांवर गुन्हा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

कोपरगाव :- आघाडीचे उमेदवार आशुतोष काळे, अपक्ष उमेदवार राजेश परजणे यांचे पोस्टर चिकटवलेल्या अॅपेरिक्षा व टाटा छोटा हत्ती ही वाहने विनापरवाना प्रचार करताना आढळल्याने संबंधित गाड्यांच्या चालक-मालकांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा गुरुवारी रात्री दाखल करण्यात आला.

राष्ट्रवादीचे उमेदवार काळे यांचे पोस्टर लावलेली टाटा एस छोटा हत्तीचा (एमएच १७ बी वाय १९५७) चालक कैलास धनवटे व अपक्ष उमेदवार परजणे यांचे पोस्टर चिटकवलेल्या ऑटो रिक्षाचा चालक गोरखनाथ महाजन (टाकळी) हा विनापरवाना प्रचाराची ध्वनिफीत वाजवताना सापडला. त्यांच्यावर कारवाई करत आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अहमदनगर लाईव्ह 24