आमचंही ठरलं; पुन्हा राम शिंदेंच !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

कर्जत तालुक्यात शिवसेनेने आयोज़ित केलेल्या निर्धार मेळाव्यात आता शिवसैनिकांचही ठरलंय…पुन्हा राम शिंदे…चं ! अशा घोषणा देण्यात आल्या.

येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात तालुका शिवसेनेच्या वतीने निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ना.प्रा.राम शिंदे यांनी केलेल्या विकासकामांच्या अनुषंगाने तसेच जनसामान्यांचे हित पाहून कर्जत-जामखेडमधील सर्व शिवसेना नेते, पदाधिकारी व शिवसैनिकांनी युतीचा धर्म पाळत ना. शिंदे यांना साथ देण्याचा निश्चय केला, या वेळी अनेकांची भाषणे झाली.

यामध्ये गेल्या पाच वर्षांत भाजप -सेना युतीच्या कारभाराचा आढावा मांडताना सत्तेत सहभागासह विविध निवडणुकीत शिवसेनेला भाजपाने मदत करावी, अशा अपेक्षा व्यक्त केल्या.

अहमदनगर लाईव्ह 24