..तर मंत्र्याना जामखेडमध्ये नो एंट्री !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

जामखेड :- कला केंद्र बंदच्या आदेशानंतर सहा दिवसांपासून सुरू असलेले केंद्रचालक व कलावंतांचे उपोषण सहाव्या दिवशी जिल्हा प्रशासनाला मागण्या कळवण्याच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.

दहा दिवसांत आम्हाला न्याय दिला नाही, तर जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक कार्यालय व पालकमंत्र्यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन करू. जामखेडमध्ये एकाही मंत्र्याला पाय ठेवू देणार नाही, असा इशारा कलावंतांच्या वतीने अरुण जाधव यांनी दिला.

उपोषणास बसलेल्या रवी कांबळे, राहुल राळेभात, संतोष काळे, मंगल जाधव, संजीवनी जाधव यांची प्रकृती खालवली होती. उपोषण सोडताना नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार, हर्षल डोके, एम. पाटील, अमोल लोखंडे, गुलशन अंधारे, अरुण जाधव, बापूसाहेब गायकवाड, सर्फराज शेख, शिवाजी हजारे, बाबा चंदन, अनिल पवार, संतोष पवार, विशाल जाधव, बाळू नाईकनवरे, अरविंद जाधव, समीर चंदन, रवी अंधारे, ज्योती पवार, संजीवनी जाधव, मंगल जाधव, अंबिका अंधारे, राजश्री जाधव यांच्यासह सर्व कलाकार उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24