अरे देवा! अज्ञात आजाराने अनेक मेंढ्यांचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :-  जामखेड तालुक्यातील खर्डा येथे सातारा जिल्ह्यातून आलेल्या मेंढपाळांच्या अनेक मेंढ्यांना पीपीआर या आजाराने मेंढ्यांना ताप ,

डोळे कान व डोके सुजणे, ठसकने, नाकाला व कानाला सूज येऊन डोळ्यातून नाकातून पिवळे पाणी पडणे आजाराची लक्षणे दिसू लागले.(Sheep news)

त्यांच्यावर उपचार करण्यात आले मात्र तरीदेखील ६२ मेंढ्यांचा मृत्यू झाला. यामुळे मेंढपाळांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले.

याबाबत अधिक माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील खर्डा किल्ला परिसरात आलेल्या मेंढपाळांच्या मेंढ्यांना पीपीआरसदृष्य आजाराने ४९ मेंढ्यांचा मृत्यू झाला.

तर गोचीड होऊ नये म्हणून औषध पाजले, परंतु औषधाची जास्त मात्रा झाल्यामुळे १३ मेंढ्या मृत पावल्या. याबाबत अहमदनगर जिल्हा पशुसंवर्धन विभागास माहिती मिळताच मृत मेंढ्यांची उत्तरीय तपासणी करून त्यांचे सॅम्पल पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले असता.

पुणे प्रयोगशाळेतून या मेंढ्यांना पीपीआर या आजाराची लागण झाल्याची माहिती दिली. त्यानुसार पशुसंवर्धन विभागाने मेंढ्यांना लसीकरण केले.

त्यातच मेंढ्यांच्या दुसऱ्या कळपातील मेंढपाळांनी गोचीड होऊ नये म्हणून औषध पाजले. मात्र या औषधाची मात्रा जास्त झाल्यामुळे १३ मेंढ्या मृत पावल्या .