अरे बापरे! लांडग्यांच्या हल्ल्यात चारजण जखमी ‘या’ तालुक्यात घडली घटना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- बिबट्याची दहशत कमी होते ना होते तोच आता परत लांडग्याची दहशत निर्माण झाली आहे. लांडग्याने केलेल्या हल्ल्यात चारजण जखमी झाले आहेत. त्यामुळे आता लांडग्यांच्या या दहशतीमुळे जामखेड तालुक्यातील रत्नापूर गावच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत सविस्तर असे की, रत्नापूर येथील बाळासाहेब वारे, विमल वारे, भाऊसाहेब वारे, लक्ष्मण वारे यांच्यावर लांडग्याने हल्ला करून चावा घेतल्याने ते जबर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना दिली

आणि या जखमींना प्रशासनामार्फत मदत करण्याचा मागणी केली.या हल्ल्यात जखमी झालेल्या चौघांवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नगरला पाठवण्यात आले आहे.

दरम्यान वनपरिमंडळ अधिकारी अनिल खराडे म्हणाले की, रत्नापूर परिसरातील चार व्यक्तींवर लांडग्याने हल्ला केला आहे.

एक तर तो लांडगा पिसाळलेला असावा किंवा त्याचे पिल्ले जवळ असावेत किंवा त्यांच्यावर कोणीतरी हल्ला केलेला असावा, त्यामुळे त्याने लोकांवर हल्ला केला असावा. जामखेड इंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळे त्यांना नगरला हलवले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24