Parner News : पारनेर मधील ‘कोरठण देवस्थानचा १५० कोटींचा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Parner News : प्रति जेजुरी नावलौकिक असलेल्या तीर्थक्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानचा १५० कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्षा सौ. शालिनी अशोक घुले व उपाध्यक्ष महेश शिरोळे यांनी दिली आहे.

दरम्यान, श्रीक्षेत्र कोरठण खंडोबाच्या वार्षिक यात्रोत्सवाच्या काळात यापुढे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाणार असल्याचीही माहिती अध्यक्षा सौ. घुले व विश्वस्त चौधरी यांनी दिली.

या अगोदर चंपाषष्ठीच्यादरम्यान या सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असे; परंतु मनुष्यबळ आणि आर्थिक झळ देवस्थानला बसत असल्याने विश्वस्त मंडळाच्या बैठकीत वार्षिक यात्रा उत्सव काळात हा सप्ताहाचे आयोजन करण्याचे ठरले आहे.

बैठकीस देवस्थान अध्यक्षा शालिनीताई घुले, उपाध्यक्ष महेश शिरोळे, माजी सरपंच अशोक घुले, विश्वस्त अॅड. पांडुरंग गायकवाड, विश्वस्त राजेंद्र चौधरी, विश्वस्त चंद्रभान ठुबे, जालिंदर खोसे, कमलेश घुले, सुवर्णा घाडगे, अजित महांडुळे, रामचंद्र मुळे धोंडीभाऊ जगताप, सुरेश फापाळे दिलीप घुले, महादेव पुंडे, यांच्यासह विश्वस्त उपस्थित होते.

बवर्ग असलेल्या तीर्थक्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानचा १५० कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्षा सौ. शालिनी अशोक घुले व उपाध्यक्ष महेश शिरोळे यांनी दिली आहे.

आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून या विकास आराखड्यासाठी निधी उपलब्ध करण्यात येणार असून, यामध्ये देवस्थान परिसरात भाग बगीचा, व्हीआयपी व्यक्तींसाठी विश्रामगृह तारांकित म्युझियम, भंडारा डोंगर ते मंदिरापर्यंत रोपवे,

मोठा हॉल व डिजिटल कमान, या प्रमुख कामांचा समावेश आहे. तर यात्राकाळात मंदिर परिसराकडे येणारा भंडारा डोंगर ते नांदुर पठार, अक्कलवाडी ते मंदिर डोंगर, साडवा पाझर तलाव ते मंदिर, या तीन प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती अशोक घुले यांनी दिली.