पारनेर

पारनेरला साकारणार ‘तांबडीकार प्रकल्प’ ; अधिकाऱ्यांनी केली जागेची पाहणी

Published by
Mahesh Waghmare

२९ जानेवारी २०२५ टाकळी ढोकेश्वर : आमदार काशिनाथ दाते यांची आमदार निवड झाल्याबद्दल वासुंदे येथील म्हणून नि आयोजित सत्कार कार्यक्रमात तांबडी कार प्रकल्प व्हावा अशी आग्रही मागणी जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी केली होती.यावेळी आ. काशिनाथ दाते यांनी हा प्रकल्प प्राधान्याने करणार असल्याचे आश्वासन या कार्यक्रमात दिले होते, त्या अनुषंगाने त्यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पारनेरच्या पाणी प्रश्नाबाबत आवाज उठविला होता तसेच जलसंपदा विभागाच्या बैठकीत आ. दाते यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे या प्रकल्पास मंजुरी मिळावी, अशी मागणी केली होती.

त्यामुळे जलसंपदा विभागाने सदर प्रकल्पासाठी अधिकाऱ्यांना सूचना करत २५० दशलक्ष घनफूट क्षमता असलेले हे धरण होण्यासाठी प्रत्यक्ष जागेची पाहणीकरण्यास सांगितले.मांडओहोळ प्रकल्पापेक्षा हे धरण छोटे असले तरी या धरणामुळे वासुंदे, वडगाव सावताळ, कर्जुले हर्या, पोखरी परिसर, खडकवाडी, शिक्री, पळशी व टाकळी ढोकेश्वर या परिसराला उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून पाणी उपलब्ध होणार आहे.

केंद्र सरकारच्या ताब्यात असलेले वनक्षेत्र, गोदावरी खोऱ्यात पाण्याचे असणारे कमी प्रमाण व प्रकल्पासाठी आर्थिक खर्चात वाढ हे या प्रकल्प होण्यात मोठे अडथळे आहेत. तथापी, सोमवारी अहिल्यानगर मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अधिकारी जगदीश पाटील व सहा. कार्यकारी अधिकारी अनंत उपाध्ये यांनी या जागेची पाहणी केली. मध्यम प्रकल्प विभागाचे हे अधिकारी तांबडी कार प्रकल्पाचा पाहणी अहवाल शासनाला देणार आहेत.

शासनाकडून परवानगी आल्यानंतर या प्रकल्पाचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण होणार असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली. तांबडी कार प्रकल्प व्हावा या साठी केंद्र व राज्य सरकार व पालकमंत्री व जल संपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे आमदार काशिनाथ दाते व जिल्हा परिषद मा. उपाध्यक्ष सुजित झावरे यांचा पाठपुरावा सुरु आहे. हा प्रकल्प व्हावा ही परीसरातील जनतेची अनेक दिवसांपासुन मागणी आहे.उत्तर पारनेर तालुक्यातील शेतकर्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या तांबडीकार प्रकल्पाच्या जागेची पाहणी सोमवार दि. २७ रोजी अहिल्यानगर मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील व सहाय्यक कार्यकारी अभियंता अनंत उपाध्ये यांनी प्रत्यक्ष स्थळावर येऊन पाहणी केली.

Mahesh Waghmare

Mahesh Waghmare is a skilled reporter and content writer who has been contributing for the past three years. His work focuses on covering local news, bringing timely and relevant updates to the community. Mahesh’s dedication to delivering accurate and engaging content has made him a trusted voice in local journalism.

Published by
Mahesh Waghmare