अहमदनगर दक्षिण

15 वर्षांपासून सराईत आरोपी होता पसार; टप्प्यात येताच आवळल्या मुसक्या

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  15 वर्षापासून दरोडा तयारी व खुनाचा प्रयत्न गुन्ह्यात पसार असलेला सराईत गुन्हेगार संजय नारायण फुगारे (रा. केडगाव, अहमदनगर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले.

त्याच्याविरूध्द श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न, शेवगाव पोलीस ठाण्यात दरोड्याची तयारी व श्रीगोंदा पोलीस ठाण्यात मारहाण, शिवीगाळ दमदाटीचा गुन्हा दाखल आहे.

स्थानिक गुन्हे शाखेकडून पसार आरोपींचा शोध सुरू आहे. शेवगाव पोलीस ठाण्यातील दरोडा तयारी गुन्ह्यात पसार आरोपी संजय फुगारे याच्याविषयी पोलिसांना माहिती मिळाली होती.

त्यानुसार पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या पथकाने आरोपी फुगारे याला बोल्हेगाव उपनगरातील आंबेडकर चौक येथून ताब्यात घेतले.

त्याने शेवगाव व श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन्ही गुन्ह्यांची कबूली दिली. पोलिसांनी त्याला अटक करत शेवगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास शेवगाव पोलीस करीत आहेत.

Ahmednagarlive24 Office