पाथर्डी

Pathardi News : खरेदी – विक्री संघावर आ. मोनिका राजळेंचे पुन्हा वर्चस्व

Published by
Ahmednagarlive24 Office

Pathardi News : पाथर्डी खरेदी- विक्री संघाच्या निवडणुकीत सतरापैकी सात जागा बिनविरोध झाल्या आहेत. सेवा सहकारी संस्था मतदारसंघातील १० जागांसाठी ११ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

आमदार मोनिकाताई राजळे यांच्या दहा जागा निवडून आल्या आहेत. पिंळगाव टप्पा येथील बाळु रावसाहेब शिरसाट हे पराभूत झाले.

त्यांना अवघ्या दहा मतांवर समाधान मानावे लागले. तरीही शिरसाट यांनी निवडणूक लढविली हे काही थोडे नाही. संघाच्या निवडणुकीत सात जागा आमदार मोनिका राजळे यांच्या समर्थकांना बिनविरोध मिळाल्या होत्या.

सेवा सहकारी संस्था व दुध संस्था मतदारसंघात दहा जागांसाठी अकरा उमेदवार निवडणूक रिंगणात होते. रविवारी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान झाले. त्यामध्ये राजळे गटाचे दहा उमेदवार विजयी झाले आहेत.

विजयी उमेदवार असे- कैलास देवढे ८८ (मोहोज देवढे), भगवान आव्हाड ८७ (जांभळी), गंगाधर गर्जे-८९ (अकोला), राम पठाडे -८७ (मिडसांगवी), संदिप पठाडे- ८६ (वसुजळगाव), नवनाथ भवार-८६ (कळसपिंप्री), भिमराव पालवे-८८ (मोहटा),

विठ्ठल मरकड-८८ ( निवडुंगा), अण्णासाहेब वांदेकर-८९ ( तिसगाव), मच्छिद्र सावंत-८७ (जोहारवाडी), यांचा समावेश आहे. बाळू रावसाहेब शिरसाट (पिंपळगाव टप्पा) हे अपक्ष उमेदवार रिंगणात होते, त्यांना १० मते मिळाली आहेत.

बिनविरोध निवडून आलेले राजळे गटाचे उमेदवारी असे- सिंधुताई साठे, सुनिता काटे, अशोक मंत्री, बाबासाहेब चितळे, पोपट कराळे, पुरुषोत्तम इजारे, संतोष भागवत, यांचा समावेश आहे. विजयानंतर राजळे गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला.

विजयी सभेत बोलताना आमदार मोनिकाताई राजळे म्हणाल्या, खरेदी-विक्री संघाची निवडणूक आपल्या हातामध्ये राहिली नाही. मते नसल्याने विरोधकांनी निवडणूक मतदार यादीची होळी केली. त्यांना निवडणूक माहीत नाही, असा बनाव केला.

आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. खासदारकी व आमदारकी राहिली आहे. २०२४ ची सुरुवात खरेदी-विक्री संघाच्या विजयाने झाली असून, असाच विजयाचा गुलाल लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.

जुन्या संचालक मंडळाने खरेदी-विक्री संघात चांगला कारभार केल्यामुळे मतदारांनी पुन्हा विश्वास टाकला आहे. मतदारांचे व कार्यकर्त्यांचे आभार मानते, असे राजळे म्हणाल्या.

बाळू शिरसाट यांनी एकट्याने ही निवडणूक लढविली. त्यांच्या सोबत पांडुरंग शिरसाट, सपंत दराडे व त्यांचे सहकारी दिवसभर मतदान केंद्रावर थांबून होते. माझा पराभव होणार हे मला माहीत होते. मात्र, तालुक्यात लोकशाही जिवंत रहावी म्हणून मी निवडणूक लढविली आहे. निवडणुकीत हार जीत चालूच असते, असे शिरसाट म्हणाले.

खरेदी-विक्री संघाचे ९६ मतदार होते. त्यापैकी ९५ मतदान झाले. ३ मते बाद झाली. ८६ ते ८९ मते अशी पसंती राजळे गटाला दाखविली. दहा मते बाळू शिरसाट यांना मिळाली.

एका मतदाराने दोनच उमेदवारांना मते दिली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नांगरे यांनी काम पाहिले, त्यांना श्री. राठोड, श्री. पातकळ, दादासाहेब कंठाळी, तात्यासाहेब काकडे, श्री. गरकळ व शिरुभाऊ यांनी सहाय्य केले.

Ahmednagarlive24 Office