Pathardi News : पाथर्डी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा. तालुक्यात दोन्ही हंगाम वाया गेले आहेत, टँकरने पाणी दिले आहे. सहा महसुली मंडळात पाऊस नसताना पिकांची व पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर आहे.
तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती असताना दुष्काळ जाहीर होणे गरजेचे आहे. सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करुन सवलती द्याव्यात. टँकर व जनावरांना चारा दिला पाहिजे.
दुष्काळाने शेतकरी अडचणीत असताना बळीराजाला दिलासा देण्याचे काम केले पाहिजे. शासनाने लवकरात लवकर दुष्काळ जाहीर कारावा, अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर यांनी या वेळी केली.
सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागमी भारतीय जनता पक्षाच्या वतीने तहसीलदार शाम वाडकर यांच्याकडे करण्यात आली आहे. भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिकरावखेडकर, अजय रक्ताटे, नारायण पालवे, अभय आव्हाड, नंदकुमार शेळके, बंदुशेठ बोरुडे,
अनिल साठे, जगदिश काले, संदीप काकडे, प्रताप एकशिंगे, प्रकाश धस, बबन सबलस, ए. डी. काकडे, अमोल गर्जे, राजेंद्र साप्ते शशिकांत हारदास, उद्धव माने,डॉ. मृत्युंजय गर्जे, अजय भंडारी यांच्यासह कार्यकर्त्यांनी तहसीलदार शाम वाडकर यांना लेखी निवेदन देऊन दुष्काळ जाहीर करण्याची मागमी केली.