पाथर्डी

विक्रेत्यांची दादागिरी निघणार मोडीत ; नागरिकांच्या ‘या’ कामामुळे राबविली जाणार ‘हि’ मोहीम

Published by
Mahesh Waghmare

२९ जानेवारी २०२५ पाथर्डी : नागरिकांच्या शहरातील रत्यावरील अतिक्रमणांबाबत तक्रारींचा पाऊस पडल्यानंतर महसूल, पोलिस, नगर पालिका, राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या विद्यमाने शहारीतील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण गुरुवारी हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.याबाबत आमदार मोनिकाताई राजळे,प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार डॉ. उद्धव नाईक, पोलिस निरीक्षक संतोष लांडगे, पालिकेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वसंतराव बडे यांच्या उपस्थितीमध्ये तहसील कार्यालयात २६ जानेवारी रोजी बैठक झाली.

या वेळी नागरिकरांनी शहरातील रस्त्यावरील अतिक्रमणे आणि व्यावसायिकांनी लावलेले हातगाडे, टपऱ्या, मासे विक्री, मांसविक्री, चहाच्या टपऱ्या आणि या व्यवसायांसमोर उभी केलेली दुचाकी आणि चारचाकी वाहने, यामुळे शहरातील रस्ते वाहतुकीस योग्य राहिले नाहीत.एकेरी वाहतूकदेखील कोंडली जाते.काही विक्रेते ग्राहकांनाच दादागिरी करीत आहेत.ही मक्तेदारी मोडीत काढण्याची मागणी अनेक नागरिकांनी आमदार मोनिकाताई राजळे, महसूस व पोलिस प्रशसानाकडे केली आहे.

याबाबत चर्चा होऊन पोलिस बंदोबस्त व पालिका अतिक्रमण हटविण्यासाठी जेसीबी, टॅक्टर व कर्मचारी असे पुरविल. बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि पोलिस अधिकारी असा मोठा फौजफाटा तैनात करण्यात येईल. अतिक्रमण धारकाविरुध्द ही कडक मोहीम राबविली जाणार आहे. कोणाचीही गय केली जाणार नाही. पक्की अतिक्रमणेदेखील पाडली जातील.

अतिक्रमणधारकांनी दोन दिवसांत स्वतः अतिक्रमणे हटवावीत, असे आवाहन पोलिस, महसूल, पालिका व बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. नगर रस्ता, कोरडगाव रस्ता, डॉ. बाबासाहेब आबेंडकर चौक, अजंठा चौक, वसंतराव नाईक चौक, शेवगाव रस्ता, नवीपेठ, गणेशपेठ बाजार समितीजवळील मच्छी मार्केट, सहकारी बँकेजवळील गटारावरील अतिक्रमण, शहर शाखेजवळचे अतिक्रमण असे शहरातील प्रमुख रस्ते, पालिका कार्यालयासमोर, उपजिल्हा रुग्णालयापर्यंतची सर्व अतिक्रमणे हटिविली जाणार आहेत.

यापूर्वी अतिक्रमणे काढली. मात्र, ते पुन्हा होऊ नयेत, याची काळजी घेतली . वारंवार अतिक्रमणे होतात मग कारवाई का केली जात नाही. कडक करावाई करा. फळविक्रेते, मच्छीविक्रेते यांना बाजारतळामध्ये जागा उपलब्ध करून देण्यात येईल. पालिकेने तेथे नियोजन करावे. रस्त्यावर कोणी वाहतुकीला अडथळा निर्माण केला तर सुरुवातील दुकानदारांच्या वस्तू जप्त करण्यात येतील. पुन्हा तसेच घडले तर कडक कारवाई केली जाईल. – प्रसाद मते, प्रांताधिकारी, पाथर्डी. शेवगाव

पालिकेने अनेकवेळा सांगुनही व्यावसायिक रस्त्यावरच अतिक्रमण करीत आहेत.वाहतुकीला अडथळा झाला की नागरिक व महिला पालिकेला दोष देतात.फळविक्रेत्यांना जागा दिली.मात्र, ते तिकडे बसत नाहीत.त्यांनी बाजारतळावर फळेविक्री करावी.महसूल, पोलिस व बांधकाम विभाग असे सर्वजण मिळून कारवाई केली जाईल. – संतोष लांडगे, मुख्याधिकारी, पाथर्डी

Mahesh Waghmare

Mahesh Waghmare is a skilled reporter and content writer who has been contributing for the past three years. His work focuses on covering local news, bringing timely and relevant updates to the community. Mahesh’s dedication to delivering accurate and engaging content has made him a trusted voice in local journalism.

Published by
Mahesh Waghmare