अहमदनगर दक्षिण

नागवडे साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी आज मतदान

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :-  श्रीगोंदा तालुक्यातील सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळच्या 21 जागांसाठी शुक्रवारी (दि.14) संक्रातीच्या दिवशी मतदान होत आहे.

या कारखान्याच्या निवडणुकीने तालुक्यातील अनेक राजकीय समिकरणे बदलणार आहेत. 14 जानेरीला ऐन संक्रातीच्या दिवशी 21 जागांसाठी मतदान होत असून सर्व 44 उमेदवारांचे भवितव्य पेटीबंद होणार आहे.

या निवडणुकीकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत काही गोंधळ होऊनये तसेच शांततापुर्ण वातावरणात मतदान पार पडावे यासाठी श्रीगोंदा पोलीसांनी पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.

14 जानेवारी रोजी होणार्‍या सहकार महर्षी नागवडे साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सत्ताधारी राजेंद्र नागवडे यांच्या किसान क्रांती पॅनल विरुद्ध आ. बबनराव पाचपुते व माजी उपाध्यक्ष केशव मगर यांच्या सहकार विकास पॅनल अशी 21 विरुध्द 21 अशी सरळ लढत होणार आहे.

तर दोन अपक्ष उमेदवार आहेत. यामुळे 21 जागांसाठी 44 उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. या निवडणुकीत आमदार बनबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते स्वतः उमेदवार आहेत.

दरम्यान कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्यासाठी हि निवडणूक महत्वाची आहे. नागवडे यांचे एकेकाळचे सहकारी केशवराव मगर यांनी हि निवडणूक कसोटीची करून ठेवली आहे.

त्यात त्यांना आमदार बबनराव पाचपुते यांची मदत मिळत असल्यामुळे नागवडे कुटुंबाला कारखाना निवडणुकीत आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office