पंजाबराव म्हणतात सप्टेंबर महिन्याच्या ‘या’ तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा जोर कमीच राहणार ! कारण की….

Pragati
Published:

Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी हवामानाचा एक नवीन अंदाज जारी केला आहे. या नवीन हवामान अंदाजात पंजाब रावांनी सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार, कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार,

कोणत्या जिल्ह्यात पावसाची विश्रांती राहणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचे स्वरूप कसे राहणार? याबाबत डिटेल माहिती दिली आहे. अशा परिस्थितीत आज आपण पंजाबरावांच्या या नवीन हवामान अंदाजाचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

काय म्हणतात पंजाबराव?

पंजाबरावांच्या नवीन हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रात 11 ते 12 सप्टेंबर पर्यंत पावसाची तीव्रता कमी राहणार आहे. मात्र असे असले तरी याही कालावधीत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

एक, दोन आणि तीन सप्टेंबरला महाराष्ट्रात जसा पाऊस झाला तसा पाऊस या कालावधीत पडणार नाही मात्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता मात्र कायम राहणार आहे. पंजाबरावांच्या मते 11 सप्टेंबर पर्यंत राज्यातील विदर्भ विभागात पावसाची शक्यता कायम राहणार आहे.

आज मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, जळगाव, विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम या भागात पावसाची शक्यता आहे. पण या भागात सर्व दूर पाऊस पडणार नाही तर भाग बदलत पाऊस पडणार आहे.

पंजाब रावांच्या नवीन हवामान अंदाजात असे म्हटले गेले आहे की, ज्यावर्षी पोळ्याला जास्त पाऊस पडतो त्यावर्षी गणरायाच्या आगमना वेळी महाराष्ट्रातील बहुतांशी भागात पावसाचा जोर कमी असतो. यामुळे यंदाही गणपतीच्या दिवसांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे.

कारण की पोळ्याला राज्यात चांगला पाऊस झाला आहे. पण असे असले तरी गणरायाच्या आगमनावेळी महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असून या भागात 11 ते 12 सप्टेंबर पर्यंत पाऊस सुरूच राहणार असे पंजाबरावांनी आपल्या अंदाजात स्पष्ट केले आहे.

तसेच पंजाबरावांनी यावर्षी 20 सप्टेंबरला राजस्थान मधून मान्सूनचा प्रतीचा प्रवास सुरू होईल अशी माहिती दिली असून महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास थोड्या उशिराने सुरू होण्याची शक्यताही व्यक्त केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe