अहमदनगर दक्षिण

कुकडी कारखान्याच्या चेअरमनपदी राहुल जगताप, तर व्हाईस चेअरमनपदी सोपानराव पवार

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- दिवंगत नेते कुंडलिकराव जगताप यांनी आयुष्यभर संघर्ष करुन उभारलेल्या कुकडी कारखान्याची निवडणूक त्यांच्या पश्चात बिनविरोध करण्याचा करिष्मा माजी आमदार राहुल जगताप यांनी करून दाखवला आहे.

कुकडी सहकारी साखर कारखार्‍यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी ११ वाजता पार पडली. विरोधी नेत्यांनी मनाचा मोठेपणा दाखविल्याने कर्मयोगी कुंडलिकराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखान्याचे सर्व २१ जागा बिनविरोध निवडण्यात यश आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी माजी आमदार राहुल जगताप यांची, तर व्हाईस चेअरमनपदी येळपणे गटातील विवेक पवार पाटील यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर चेअरमन तथा माजी आमदार राहुल जगताप यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.

अगोदर कुकडी कारखान्याची निवडणूक बिनविरोध करून माजी आमदार राहुल जगताप यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

तर श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी सहकारी साखर कारखाना आणि श्रीगोंदा सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना यांच्या निवडीच्या प्रक्रिया सुरू आहेत.

श्रीगोंदा सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी किसान क्रांती पॅनेलने प्रत्येक गटात दीड ते दोन हजारांच्या मताधिक्याने २१-० अशी आघाडी घेत पाचपुते-मगर गटाचा दारुण पराभव केला आहे.

Ahmednagarlive24 Office