राहुरी

राहुरी शेतकरी मंडळाचे धनराज गाडे कर्डिले गटात; परंतु शेतकरी मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा मात्र प्राजक्त तनपुरे यांनाच पाठिंबा

Published by
Ajay Patil

Ahilyanagar News:- राहुरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून आमदार प्राजक्त तनपुरे हेच निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांची लढत ही प्रामुख्याने माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सोबत होणार आहे. या पार्श्वभूमीवर राहुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचालींना वेग आलेला आहे.

या अनुषंगाने जर बघितले तर मागील काही दिवसाअगोदर राहुरी शेतकरी मंडळाचे धनराज गाडे यांनी कर्डिले गटात प्रवेश केला असून त्यामुळे प्राजक्ता तनपुरे यांना हा एक धक्का मानला जात होता.

परंतु राहुरी येथे आ. प्राजक्ता तनपुरे यांच्या कार्यालयामध्ये तालुक्यातील अनेक गावातील सरपंच तसेच उपसरपंच, सेवा संस्थेचे अधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा ताफा दाखल झाला.

यावेळी या सगळ्या कार्यकर्त्यांनी आमदार तनपुरे यांची भेट घेत शेतकरी मंडळाचे सगळे कार्यकर्ते आमदार प्राजक्ता तनपुरे यांच्या सोबत असल्याचे विश्वास दिला.

 राहुरी शेतकरी मंडळाच्या कार्यकर्त्यांचा प्राजक्त तनपुरे यांना पाठिंबा

स्व. शिवाजीराव गाडे यांनी शेतकरी मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला एका कुटुंबाप्रमाणे जपले आहे. त्यामुळे त्यांचा जो काही विचार होता त्याचाच वारसा घेऊन शेतकरी मंडळ राजकारणामध्ये काम करत आहे.

परंतु त्यांचेच वारस असलेले धनराज गाडे यांनी मात्र वेगळा मार्ग धरत विरोधकांना साथ देण्याचा निर्णय घेतला व हा निर्णय त्यांचा वैयक्तिक निर्णय असून स्व. गाडे यांचा वैचारिक वारस असलेले शेतकरी मंडळाचा प्रत्येक कार्यकर्ता हा आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या खांद्याला खांदा लावून राहुरीची अस्मिता जपणार असल्याचा निर्धार शेतकरी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला.

राहुरी येथे आमदार प्राजक्ता तनपुरे यांच्या कार्यालयामध्ये तालुक्यातील अनेक गावातील सरपंच तसेच उपसरपंच व सेवा संस्थेचे पदाधिकारी यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते हे दाखल झाले होते व यावेळी त्यांनी प्राजक्त तानपुरे यांची भेट घेतली व शेतकरी मंडळाचा कार्यकर्ता आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या सोबत असल्याची ग्वाही दिली.

धनराज गाडे यांनी जो काही विरोधी गटात प्रवेश केला त्याला संपूर्ण शेतकरी मंडळाचा विरोध असल्याचे मत  स्व. शिवाजीराव गाडे यांचे खंदे समर्थक असलेले मच्छिंद्र सोनवणे,

बारागाव नांदूर सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष विश्वास तात्या पवार तसेच संचालक गणेश गाडे, राजेंद्र गाडे तसेच उंबरे येथील कारभारी ढोकणे, म्हैसगावचे चांगदेव चोपडे, कुरणवाडीचे सर्जेराव केदारी इत्यादी अनेक कार्यकर्त्यांनी आमदार प्राजक्ता तनपुरे यांना पाठिंबा येणार असल्याचा निर्धारित केला

 शेतकरी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कोणतीही अपेक्षा बाळगता साथ देण्याचा निर्णय मी कधीही विसरणार नाहीआमदार प्राजक्त तनपुरे

2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये स्व. शिवाजीराव गाडे यांच्या गटाने साथ दिल्यामुळे माझा विजय सुकर झाला होता. जेव्हा मी आमदार झालो तेव्हा मला कोणी साथ दिली व कोणी नाही हे कधीच पाहिले नाही.

परंतु आज विधानसभा निवडणूक सुरू असताना शेतकरी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता  मला साथ देण्याचा जो काही निर्णय घेतला आहे त्या निर्णयाला मी कधीही विसरणार नाही असे आमदार प्राजक्ता तनपुरे यांनी यावेळी म्हटले.

Ajay Patil