माझ्या मामाच्या मुली सोबत बोलू नकोस; संतापलेल्या तरुणांकडून तरुणीला बेदम मारहाण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राहुरी : माझ्या मामाच्या मुलीसोबत बोलत जाऊ नको, असे म्हणाल्याचा राग आल्याने चार जणांनी मिळून नंदिनी सडमाके या तरुणीला मारहाण केल्याची घटना दिनांक १५ जून २०२३ रोजी राहुरी तालुक्‍यातील तांदुळवाडी येथे घडली आहे.

या घटनेत ही तरुणी जखमी झाल्याने तिच्यावर श्रीरामपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पोलिसांनी माहिती दिली, की नंदीनी अरुण सडमाके, वय २४ वर्षे, रा. तांदुळवाडी, ता. राहुरी. ही तरूणी राहुरी तालूक्यातील तांदूळवाडी येथे तीच्या कुटुंबासह राहत असून आरोपी हे तीच्या शेजारीच राहत आहेत.

दि. १५ जून २०२३ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास नंदिनी सडमाके ही घरी असताना घरासमोर आरोपी कन्हैय्या कन्नाके हा उभा होता. त्यावेळी नंदिनी त्याला म्हणाली की, तू माझ्या मामाच्या मुली सोबत बोलत जावू नकोस.

असे म्हणाल्याचा त्याला राग आल्याने त्याने इतर आरोपींना बोलावून घेतले. सर्व आरोपी नंदिनी हिला शिवीगाळ करू लागले. तेव्हा नंदिनीचा भाऊ गोविंद हा आरोपींना म्हणाला की, तुम्ही माझ्या बहीणीला शिव्या देवु नका.

तेव्हा आरोपींनी नंदिनी अरूण सडमाके व तीचा भाऊ गोविंद या दोघांना लाकडी काठी वब लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. तसेच धमकी दिली. या घटनेत नंदिनी ही जखमी झाल्याने तीच्यावर श्रीरामपूर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तीने पोलिसा समक्ष दिलेल्या जबाबावरून आरोपी कन्हैया सुर्या कन्नाके, युवराज विशाल कन्नाके, अजय सुर्या कन्नाके, रवि हरी कन्नाके (सर्व राहणार तांदूळवाडी, ता. राहुरी) या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.