Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील प्रसाद शुगर अॅण्ड अलाईड अॅग्रो प्रॉडक्ट्स लि. या कारखान्याचा सन २०२३ – २४ चा गळित हंगाम दि. ३ नोव्हेंबर २०२३ रोजीपासून चालु झालेला असून
या गळित हंगामात गळितास येणाऱ्या उसास प्रथम उचल प्रति मे.टन २७०० रुपयांप्रमाणे व अंतिम ऊसदर इतर कारखान्यांच्या बरोबरीने देण्याचे जाहीर केले असल्याची माहिती कारखान्याचे मार्गदर्शक माजी खासदार प्रसाद तनपुरे, अध्यक्ष माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे व कार्यकारी संचालक सुशिलकुमार देशमुख यांनी दिली आहे.
याबाबत पत्रकात म्हटले, की या हंगामात गळितास ऊस पुरविणाऱ्या उत्पादकांना पहिली उचल रक्कम २७०० प्रती मे.टन व इतर कारखाने जो अंतिम ऊस दर देतील त्याप्रमाणे प्रसाद शुगर ऊस दर देण्याची कारखाना व्यवस्थापन हमी देत असुन प्रसाद शुगरने आतापर्यंत उसाच्या वजनाबाबत पारदर्शीपणा ठेवलेला आहे.
यापुढेही प्रसाद शुगर असाच पारदर्शीपणा ठेवील, असे कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने कारखान्याचे कार्यकारी संचालक सुशिलकुमार देशमुख यांनी सांगितले. तसेच प्रसाद शुगर कारखान्याने पहिली उचल २७०० व अंतीम ऊस दर इतर कारखान्यांच्या बरोबरीने देणार असल्याचे जाहिर केल्यामुळे ऊस उत्पादकांची दिपावली गोड केली आहे.
दरवर्षी प्रमाणे ऊस उत्पादकांनी ऊस गळीतास दिल्यापासुन १४ दिवसांच्या आत पेमेंट उत्पादकांच्या खात्यांवर वर्ग करण्याच्या नियमीत नियोजनामुळे ऊस उत्पादक शेतऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या गळीत हंगामात कारखाना व्यवस्थापनाने ५.५० लाख मे. टन गाळपाचे उदिष्ट निश्चित केलेले आहे.
ऊस उत्पादकांचा ऊस वेळेत तोडण्यासाठी सक्षम ऊस तोडणी व वाहतुक यंत्रण भरती केली असुन कारखान्याने कार्यक्षेत्रात व कार्यक्षेत्राबाहेर स्वतंत्र ऊस तोडणी यंत्रणा कार्यन्वीत केलेली आहे. या गळीत हंगामात गळीतास उभा असलेला संपुर्ण ऊस गाळपासाठी प्रसाद शुगरला देवुन सहकार्य करावे, असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाने केलेले आहे.