राहुरी ते शनिशिंगणापूर रस्त्यावरील गोटुंबे आखाडा येथे चालकास लुटमार करून पिकअप बोलेरो गाडी व चालकाचा मोबाईल फोन जबरी चोरी करून घेऊन जाणारे आरोपी राहुरी पोलिसांनी मुद्देमालासह जेरबंद केले. त्यांच्याकडून ३ लाख ५० हजार रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितलले, की दि. १५ डिसेंबर २०२३ रोजी रात्रीच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील तात्याराम शामराव मांडवे यांना एका अनोळखी इसमाने शिर्डीजवळील गावातून दोन मोटारसायकली आणण्याचे भाडे आहे, अशी बतावणी करुन फिर्यादीची बोलेरो पिकअप क्रमांक एमएच १४ जीडी ७०९० ही गाडी घेऊन अहमदनगर येथे आले.
त्यानंतर अनोळखी इसमाने त्याच्या साथीदारास अहमदनगर येथून सोबत घेऊन मोटारसायकल आणण्याचा बनाव करून अहमदनगर ते शिर्डी जाणाऱ्या रस्त्याने निघून पुन्हा राहुरी ते शनिशिंगणापूर रस्त्यावरील राहुरी खुर्द गावाच्या शिवारातील गोटुंबे आखाडा येथे घेऊन जाऊन फिर्यादीच्या ताब्यातील पिकअप वाहन व मोबाईल फोन बळजबरीने घेऊन गेले.
त्याबाबत फिर्यादी तात्याराम शामराव मांडवे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १३८३/२०२३ नुसार भा.दं. वि. कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कौशलराम निरंजन वाघ, हेड कॉन्स्टेबल सुरज गायकवाड, राहुल यादव, विकास साळवे, कॉन्स्टेबल संतोष राठोड व पोलस नाईक आकाश बहिरट यांनी तांत्रीक व विश् लेषणात्मक करुन गुन्हा उघडकीस आणला.
हा गुन्हा आरोपी आरोपी प्रतिक पांडुरंग आतरक (मूळ रा. सावतानगर नागरदेवळे, ता.नगर, हल्ली राहणार विठठल रुख्मिणी मंदिराजवळ, बोल्हेगांव गावठाण, ता. नगर) व संतोष नामदेव रणदिवे (रा. मुळानगर, ता. राहुरी, जि. अहमदनगर) यांनी केलेला असल्याचे तपासात समोर आले. आरोपींना अहमदनगर येथून मुददेमालासह १२ तासांच्या आत ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणलेला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कौशलरामनिरंजन बाघ, हेड कॉन्स्टेबल सुरज गायकवाड, राहुल यादव, विकास साळवे, कॉन्स्टेबल संतोष राठोड, पोलीस नाईक आकाश बहिरट यांनी केली.