अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :- पाथर्डी तालुक्यात एका उसाच्या शेतामधे बनावट दारु तयार करण्याच्या कारखान्यावर पाथर्डी पोलिस व उत्पादन शुल्क विभागगाच्या पथकाने छापा टाकला.
यात पोलिसांनी तयार केलेली बनावट दारु व साहीत्य असा सव्वापाच लाख रुपयाचा माल जप्त केला आहे. याप्रकरणी विजय बाबुराव आव्हाड (रा. जांभळी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेतले आहे.
आव्हाड याला याच प्रकारच्या गुन्ह्यात यापूर्वी पोलिसांनी दोन वेळा अटक केली होती. याबाबत सविस्तर माहिती अशी की,बनावट दारु तयार करण्याच्या गुन्ह्यात आव्हाड जामीनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा त्याच्या राहत्या घराच्या जवळच उसाच्या शेतात दारु तयार करण्याचे काम सुरु केले होते.
पोलिसांना छापा मारला तेव्हा तयार केलेला व बाँक्समधे भरलेला दारुचा मोठा साठा मिळाला. यात सुमारे पंधरा बँरल स्पिरीट , दोन पाण्याच्या टाक्या, लेबल, स्क्रिनपेंटींगचे मशीन,बुच लावण्याचे मशीन,
संत्रा, अपनाधार, भिंगरी व संजीवनी कपंनीचे बनावट लेबल, बारा हजार बुच, ८० गोण्या दारुच्या मोकळ्या बाटल्या, ८४ बनावट तयार केलेल्या दारुचे बाँक्स असा मोठा ऐवज पोलिसांना सापडला.