अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- एका शेतकऱ्याने शेतात बसवलेला सव्वा लाख रुपये किंमतीचा सोलर प्लँट चोरट्यांनी चोरून नेला आहेे.
हा प्रकार नगर तालुक्यातील पांगरमल येथे एका शेतकऱ्याच्या शेतात घडला. याप्रकरणी विष्णू नारायण आव्हाड (वय ६७, रा. पांगरमल) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यांनी त्यांच्या शेतामध्ये क्रिस्टल पॉवर कंपनीचे सोलर प्लँट लावलेला होता. त्यामध्ये पाच एचपी मोटर, पाच एच कंट्रोलर व १५ सोलर प्लँट होते.
आव्हाड यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध चोरीचा गुन्हा नोंदवला आहे.
प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मागदर्शनाखाली पोलिस नाईक गांगुर्डे हे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.