अहमदनगर दक्षिण

बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी मोकाटेला जेऊर गटातून शिवसेनेकडून उमेदवारी

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आपल्याला पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागेल.

त्यामुळे निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन विरोधकांनी गोविंद मोकाटे यांचे राजकीय भवितव्य संपविण्याचे षडयंत्र आखले असून त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविले आहे. विरोधकांचे कारनामे सर्वश्रूत असून जिल्हा परिषद निवडणुकीत जेऊर गटातून मोकाटे यांनाच शिवसेनेकडून उमेदवारी असेल असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी जाहीर केले.

मांजरसुंबा येथे सव्वा कोटी रुपायांच्या विविध विकास कामांचा प्रारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. गाडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके,

बाळासाहेब हराळ, तालुका प्रमुख राजेंद्र भगत, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष उद्धव दुसुंगे, प्रविण कोकाटे, डॉ. राम कदम, पंढरीनाथ कदम, पंचायत समिती सदस्य गुलाब शिंदे उपस्थित होते.

मोकाटेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल… लैगिक शोषण केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशन येथे मोकाटे याच्यावर बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल आहे.

तसेच मोकाटे हा फरार आहे. तसेच त्याचे जिल्ह्यातील मोठे राजकीय नेत्यांशी संबंध आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office