अहमदनगर दक्षिण

धक्कादायक! ‘या’तालुक्यात प्रेमी युगलाची आत्महत्या प्रेयसीच्या आत्महत्येनंतर प्रियकरानेही व्हॉटसपवर स्टेटट्स ठेवून घेतला गळफास !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :- प्रेयसीने आत्महत्या नंतर काही तासातच प्रियकर मुलाने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. एकाच दिवशी दोघांनी आत्महत्या केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना जामखेड तालुक्यातील आपटी या ठिकाणी घडली. या बाबत समजलेली माहिती अशी की, बुधवारी जामखेड तालुक्यातील आपटी या ठिकाणी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान एका अल्पवयीन मामाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

ती माहिती याच गावात राहणार्‍या तिच्या प्रियकरास समजली. यानंतर आपल्या तिने नक्की आत्महत्या केली आहे का? याची खात्री करण्यासाठी तो प्रियकर मुलीच्या घरी जाऊन पाहिले.

या नंतर त्या मुलाने देखील व्हॉटसपवर मी देखील माझे जीवन संपवत आहे, असा स्टेट्स ठेवला व त्याच दिवशी दुपारी तीनच्या दरम्यान शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

या बाबत दोघांनीही आत्महत्या का केली याची माहिती अद्याप समोर आली नसुन दोघांचे प्रेम संबध होते अशी माहिती समोर आली आहे. पोलीस त्या दृष्टीने तपास करीत आहेत.

Ahmednagarlive24 Office