सध्या नेत्यांपेक्षा कार्यकर्ते शिरजोर अशी स्थिती आपल्याला राजकारणात दिसून येते. नितीन मागे फिरत चमकोगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या आता कमी राहिलेली नाही व प्रत्येक ठिकाणी हे कार्यकर्ते नेत्यांसोबत मिळवताना आपल्याला दिसतात व स्वतःची फुशारकी मारून घेण्यामध्ये धन्यता मानतात.
तसे पाहायला गेले तर सगळेच कार्यकर्ते तसे नाहीत परंतु काही कार्यकर्ते मात्र नेत्यांच्या नावाने खूप नको ते उद्योग करत असतात व कधीकधी या नको त्या उद्योगामुळे स्वतः अडचणीत येतात.
याच पद्धतीची घटना एका भावी आमदार म्हणून घेणाऱ्या श्रीगोंद्यातील एकाने त्याच्या बाबतीत बिहार राज्यात घडली असून या तथाकथित नेत्याच्या वाहनांमध्ये दारू सापडल्याच्या कारणावरून बिहार पोलिसांनी त्याला अटक केली असल्याची चर्चा सध्या श्रीगोंदा मध्ये सुरू आहे.
परंतु या नेत्याला राज्यातील एका बड्या हे त्याच्या स्वीय सहायकाने सोडले असल्याचे देखील यामध्ये बोलले जात आहे. त्यामुळे नेमके प्रकरण काय आहे? हे आपण बघू.
श्रीगोंद्यातील एका नेत्याची बिहार राज्यात अटकेची चर्चा
सध्या श्रीगोंदा तालुक्यात भावी आमदार खूप झाले आहेत. अशाच एका भावी आमदाराला बिहार राज्यात गाडीमध्ये दारू सापडल्याच्या कारणावरून अटक झाल्याची चर्चा श्रीगोंद्यात सुरू आहे.
दरम्यान या नेत्याला राज्यातील एका बड्या दादा नेत्याच्या स्वीयसहायकामुळे सोडण्यात आले असल्याचे समजते. श्रीगोंदा तालुक्यातील एक नेता बिहार या राज्यात गेला होता.
बिहारमध्ये दारुबंदी असल्याने या राज्यात दारूबाबत कठोर कायदे आहेत. असे असताना या महाशयांच्या वाहनात पोलिस तपासणीत दारू आढळून आली. त्यामुळे बिहार पोलिसांनी त्यांना तात्काळ वाहनासह ताब्यात घेतले.
दरम्यान या नेत्याने राज्यातील सत्तेतील “दादा” नेत्याच्या स्वीयसहाकाला संपर्क साधून गयावया केली. सुरुवातीला दादा नेत्याच्या स्वीयसहायकांचाही पारा चढला असल्याचे समजते.
त्यानंतर बिहार पोलिसांशी दादा नेत्यांचे पीए साहेब बोलल्यावर त्या भावी आमदाराची सुटका करण्यात आली आहे. या प्रकाराची श्रीगोंद्यात दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.
वाहनात पोलिस गाडीवर व्हीआयपी लिहून मिरवायचा
स्वतःच्या अलिशान गाडीवर व्हीआयपी लिहून आपण राज्यातील दादा नेत्याच्या तसेच एका संविधानिक महत्वाच्या पदावर असणाऱ्या नेत्याच्या जवळ आहोत हे दाखवत हा नेता तालुक्यात मिरवत होता. दरम्यान या भावी आमदाराला परराज्यातील पोलिसांचा हिसका पाहायला मिळाल्यामुळे तालुक्यात राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू आहे