माजी आमदार राहुल जगताप यांच्या पत्नी डॉ. प्रणाेती जगताप चर्चेत…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- माजी आमदार राहुल जगताप यांच्या सौभाग्यवती डॉ. प्रणाेती जगताप राजकीय क्षेत्रात सध्या सक्रीय राहत वेग धारण केला. कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या पट्ट्यातील व जिल्हा परिषदेच्या कोळगाव, येळपणे, बेलवडी, मांडवगण व श्रीगोंदे शहर या गटात त्यांनी घरोघरी जाऊन महिलांना हळदी-कुंकू केल्याने त्या चर्चेत आल्या आहेत.

कुकडी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. त्या निवडणुकीत सोसायटी मतदार संघातून बिनविरोध निवडून जात डॉ. प्रणोती यांचा राजकीय श्रीगणेशा झाला. त्यातच हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून राजकीय वातावरण ढवळून काढले.

निवडणूक झाल्यानंतर सभासदांना प्रेमाची भेट देण्यासाठी त्यांनी घरोघरी जाऊन महिलांना साड्या वाटण्याचा उपक्रम हाती घेतलेला. तद्नंतर आता संक्रांतीचा बेत आखत त्यांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू केला. त्यांच्या या कार्यक्रमाला महिला वर्गातून मोठ्या प्रमाणात दाद मिळत आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर त्या लवकरच तालुक्याच्या राजकारणात सक्रीय होणार की काय या चर्चेला उधाण आले. कौटुंबिक कारणाने त्यांचा दौरा सुरू असला तरी यामागे राजकीय गंध असल्याचे जाणवते.

राहुल जगताप यांच्या राजकारणाची सूत्रे हाती घेत डॉ. प्रणाेती या त्यांच्या मागील राजकीय सूत्रधार ठरतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने ही सगळी तयारी चालू असल्याचे जगताप समर्थकांचे म्हणणे आहे. याला वेळ असला तरी आपल्या वाटचालीला हळदी-कुंकवाचा गंध देण्याचे काम प्रणाेती जगताप यांच्याकडून लिलया सुरू आहे.

दरम्यान, श्रीगोंदे तालुक्यामध्ये सध्या आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांची पायाभरणी सुरू आहे.

आमदार राहुल जगताप यांच्या पत्नी प्रणोती यांनी यासाठी हळदी-कुंकू कार्यक्रमातून महिलांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत,