श्रीगोंदा

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा बाजार समितीत सुरू होणार लिंबू कमोडिटी मार्केट; सभापती अतुल लोखंडे यांची माहिती

Published by
Ajay Patil

Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यामध्ये जर आपण बघितले तर मोठ्या प्रमाणावर लिंबूची विक्री केली जाते. त्यामुळे तालुक्यातील आणि जिल्ह्यातील लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना लिंबूची विक्री करणे सोपे जावे या दृष्टिकोनातून श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिंबू कमोडिटी मार्केट सुरू केले जाणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती श्रीगोंदा बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी दिली.

श्रीगोंदा बाजार समितीचे 21 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. त्यामुळे आता लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे. श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जर लिंबू कमोडिटी मार्केट सुरू झाले तर राज्यातील आणि देशाबाहेरील व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांचा लिंबू खरेदी करता येणार आहे व याचा नक्की फायदा शेतकऱ्यांना येणाऱ्या भविष्यकाळात होणार आहे.

 श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू होणार लिंबू कमोडिटी मार्केट

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिंबू कमोडिटी मार्केट सुरू करणार असल्याची माहिती बाजार समिती सभापती अतुल लोखंडे यांनी दिली.

श्रीगोंदा बाजार समितीच्या एकविसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

श्रीगोंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणात लिंबू विक्री होत आहे. राज्यासह देशाबाहेरील व्यापाऱ्यांना श्रीगोंद्यातील लिंबू खरेदी करता यावे, यासाठी बाजार समितीमध्ये कमोडिटी मार्केट सुरू करणार असून बाहेरील व्यापाऱ्यांना लिंबू ऑनलाईन खरेदी करता येऊ शकते.

काष्टी येथील उपबाजार समितीमध्ये शनिवार सोडून इतर वारी कांदा, भुसार, डाळिंब खरेदी विक्री सुरू करणार. कोळगाव येथे कांदा, भुसार मालाचे, घोगरगाव, देवदैठण उपबाजार समिती सुरू करणार.

संस्थचा घोटाळेबाज सचिव दिलीप डेबरे यांना बडतर्फ करण्याची एकमुखाने मागणी होताच सभापती लोखंडे यांनी डेबरे यांच्यावर कायदेशीर कारवाई चालू असून, त्यांना कायमस्वरूपी बडतर्फ करून त्याची वसुली करण्यासाठी वेळप्रसंगी संपत्तीवर टाच आणण्यासाठी प्रक्रिया सुरू करणार असल्याचे लोखंडे यांनी सांगितले.

या वेळी टिळक भोस, अॅड. विठ्ठल काकडे, बाबासाहेब इथापे, राजेंद्र म्हस्के, बाळासाहेब गिरमकर,राजेश पाचपुते, हनुमंत जगताप अनेकांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी माजी आमदार राहुल जगताप, केशवभाऊ मगर, विलासकाका वाबळे, सुरेशनाना लोखंडे, हरिदास शिर्के,

लक्ष्मण दिवेकर, अॅड. विठ्ठल काकडे, बाबासाहेब इथापे, अशोक नवले, सुदाम नवले, यांच्यासह बाजार समितीचे उपसभापती मनिषा मगर, दिलीप मेहता यांच्यासह सर्वसंचालक, शेतकरी, व्यापारी उपस्थित. सूत्रसंचालन अजित जामदार, प्रास्ताविक रामदास झेंडे, आभार अॅड. महेश दरेकर यांनी मानले.

Ajay Patil

Published by
Ajay Patil