Ahilyanagar News:- अहिल्या नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ हा राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असा मतदार संघ असून महायुतीची भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर या ठिकाणहून प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नागवडे मात्र नाराज झाल्याचे चित्र होते.
कारण त्यांना श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु या ठिकाणहून भाजपाकडून प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नागवडे यांनी राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा दिला व मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्धव सेनेत प्रवेश केला. उद्धव सेनेत प्रवेश केल्यानंतर लगेचच त्यांना एबी फॉर्म देखील मिळाल्याची माहिती समोर आलेली आहे.
अनुराधा नागवडे यांना सेनेचा एबी फॉर्म, मात्र उद्धव ठाकरे सेनेच्या पहिल्या उमेदवारांच्या यादीत मात्र नाव नाही
बाबत सविस्तर वृत्त असे की, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, अनुराधा नागवडे यांनी मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्धव सेनेत प्रवेश केला असून लागलीच त्यांना श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी एबी फॉर्म देण्यात आला.
जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती तेव्हा नागवडे यांनी काँग्रेस मधून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यांना श्रीगोंदा मधून विधानसभा निवडणूक लढवायची होती अजित पवार गटाकडून त्यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती.
परंतु श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ हा महायुतीत भाजपकडे गेल्याने भाजपने प्रतिभा पाचपुते यांना उमेदवार जाहीर केली.त्यामुळे नागवडे हे नाराज होऊन त्यांनी राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन हा महाविकास आघाडीतील इतर पक्षांकडे उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले
व अखेर बुधवारी दुपारी उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत तसेच साजन पाचपुते यांच्या हस्ते राजेंद्र नागवडे, अनुराधा नागवडे, दीपक नागवडे व आदेश नागवडे यांना शिवबंधन बांधण्यात आले. त्यानंतर ठाकरे सेनेने सायंकाळी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली परंतु त्यात मात्र नागवडे यांचे यादीत नाव नव्हते.