अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2021 :- परळी ते मुंबई हा रोड श्रीगोंदा शहरातून जात आहे. मात्र हा सिमेंटचा रस्ता झाल्याने सर्वच वाहने जास्तीत जास्त वेगाने धावत असतात. अजुन काही ठिकाणी कामे रस्त्याचचे बाकी आहेत.
तरी सुध्दा छोटी मोठी वाहने भरधाव वेगाने धावत आहेत. मात्र या रस्त्याच्या परिसरात वन्यजीवांचा वावर असल्याने अनेकदा वेगवान वाहनाची धडक बसून वन्यप्राणी मृत्यूमुखी पडत आहेत.
त्यामुळे वन विभागाने त्या भागात रस्त्याच्या कडेने वन्यजीवांच्या माहितीचे बोर्ड लावावेत. जेणे करुन वाहनाचा वेग मर्यादित राहुन वन्यजीवांच्या जिवीतास धोका उत्पन्न होणार नाही.
अशी मागणी केली जात आहे. दरम्यान काल पहाटे श्रीगोंद्याजवळील होलेवाडी परिसरातरस्ता ओलंडत असलेल्या एका हरणास भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी गाडीने धडक देऊन जबर जखमी केले.
मात्र या जखमी हरणाच्या पाठीमागे परिसरातील कुत्रे लागले. त्यामुळे ते हरीण जीवाच्या अकांताने सैरावैरा धावत होते. यावेळी या रस्त्याने दुचाकीवर प्रवास करत जाणाऱ्या प्रवाशांनी या कुत्र्यांना पळवून लावत त्या हरणाचे प्राण वाचवले.