श्रीगोंदा

Shrigonda News : मंदिर चोरी प्रकरणी पारगाव पुन्हा बंद पोलिसांना दोन दिवसाचा अल्टीमेटम…. अन्यथा पुन्हा गाव बंद

Published by
Ahmednagarlive24 Office

Shrigonda News : श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रीक येथील श्री सुद्रिकेश्‍वर महाराज मंदिरातील ५० किलो वजनाचे सिंहासन चोरी गेल्याची घटना घडली.

पोलिसांनी या घटनेचा तत्काळ तपास लावावा यासाठी मंगळवार (दि.१३) रोजी पारगाव गाव बंद ठेवण्यात आले होते.

दरम्यान आ. बबनराव पाचपुते, तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे व पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, यांनी मध्यस्थी करत दोन दिवसात आरोपी सापडतील अशी ग्वाही दिल्यानंतर गाव बंद आंदोलन मागे घेण्यात आले.

दि.१२ फेब्रुवारीच्या मध्यरात्री श्री सुद्रिकेश्वर महाराज मंदिरातील ५० किलो वजनाचे सिंहासन चोरट्यांनी चोरून नेले. संतप्त ग्रामस्थांनी काल दिवसभर गाव बंद ठेऊन या घटनेचा निषेध नोंदवला.

पोलिसांनी घटनेची दखल घेत तपासी यंत्रणा सक्रिय केली मात्र तपासात वेळ लागत असल्याने आज सकाळपर्यंत कुठलेच धागेदोरे हाती लागले नाही. संतप्त ग्रामस्थानी मंगळवारी पुन्हा गाव बंद ठेवले होते.

दरम्यान आ.पाचपुते, तहसिलदार डॉ. वाघमारे व पोलीस निरीक्षक भोसले यांनी ग्रामस्थांची समजूत घालत दोन दिवसात आरोपी सापडतील. आमचा तपास अंतिम टप्यात आला आहे. त्यानंतर गाव बंद आंदोलन मागे घेण्यात आले. पुढील दोन दिवसात तपास न लागल्यास पुन्हा गाव बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा गावकऱ्यांनी दिला.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office