अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :-दोन ऊस तोडणी कामगार उस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर बदली करत असतांना अचानक फुटून जबर जखमी झाले असल्याची घटना आरडगांव येथे घडली आहे.
या दोघा कामगारांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे दोघे प्रसाद शुगर कारखान्याचे कामगार आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,
राहुरी तालुक्यातील आरडगांव येथे हॉटेल किनारा शेजारी प्रसाद शुगर कारखान्याच्या तीन टोळ्या कार्यरत आहेत. दरम्यान आज जिजाबराव चव्हाण व दयाराम सोनवणे व हे दोघे ऊस तोडणी कामगार सकाळी १० वाजण्याच्या सुमारास नादुरुस्त असलेले उस वाहतूक जाणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर बदली करत होते.
यावेळी ट्रॅक्टरचे टायर बदली करत असतांना अचानक टायर फुटले व दोघे गंभीर जखमी झाले आहे. या दोघांच्या पायाला जबर मार लागल्याने तातडीने रुग्णवाहिका बोलावून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.