अहमदनगर दक्षिण

नेट परीक्षेत राहुरी कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी रोवला यशाचा झेंडा

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :-  नवी दिल्ली येथील कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळातर्फे ऑगस्ट 2021 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्रीय पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

दरम्यान या नेट परीक्षेत महात्मा फुले कृषी विद्यापीठातील विविध विद्याशाखातील 138 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

राहुरी अंतर्गत येणार्‍या कृषी महाविद्यालयांच्या 123 यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये पदव्युत्तरचे 43 तर आचार्य पदवीचे 80 विद्यार्थ्यांनी नेट परीक्षेत यश संपादन केले आहे.

कृषी संशोधन सेवा भरती परीक्षेच्या लेखी परीक्षेत 15 विद्यार्थ्यांपैकी कृषी अभियांत्रिकीचे 04, मृदविज्ञान व कृषी रसायनशास्त्र 01,

कृषी वनस्पतीशास्त्र 02, बियाणे विज्ञान व तंत्रज्ञान 01, वनस्पती रोगशास्त्र 02, विस्तार शिक्षण 02, वनस्पती शरीरशास्त्र 01 व कृषी विद्या विषयाचे 02 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यार्थ्यांची 138 ही संख्या अंतिम नसून त्यात भर पडू शकते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office