अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- राज्यात मागील दोन दिवसांपासून वातावरणात बदल तसेच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
मात्र रात्रभर सुरू असलेला अवकाळी पाऊस व हवेतील गारवा यामुळे पुणे, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातून मेंढ्या मृत झाल्याची घटना समोर आली आहे.
या घटनेमुळे पशुपालकांमध्ये मोठी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जोरदार पडलेल्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव शिरूर खेड तालुक्यातील व अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पशुधन धोक्यात आले आहे.
यात प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील मेंढ्या चारण्यासाठी आलेली मेंढपाळ कुटुंबाचे मोठे नुकसान झाले.
विशेष बाब म्हणजे जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी येथील एकाच गावांतील सात मेंढपाळ कुटुंबातील 80 हुन अधिक मेंढ्या मरण पावल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.
यामुळे मेंढपाळांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान राज्यासह जिल्ह्यात सध्या बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांची पिके देखील धोक्यात येऊ लागली आहे. यामुळे संकटांचा सामना करणाऱ्या बळीराजासमोर पुन्हा एक नवीन संकट येऊन उभे राहिले आहे.