अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला आहे. थंडीचा कडाका जिल्ह्यात वाढला असून गेल्या आठवडाभरापासून तापमानाचा पारा खाली येताना दिसत आहे. त्यामुळे नगरकर गारठले आहेत.
नगर जिल्ह्यात सर्वदूर बुधवारी सकाळपासून पावसाची हजेरी सुरू आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. काल दिवसभर आणि रात्रीही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.
पाऊस काही जास्त पडला नाही. मात्र, त्यामुळे पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. सोबतच पावसात सुटलेले वारे. यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. अक्षरशः घराबाहेर पडणे नकोसे झाले आहे.
त्यामुळे शहरातील रस्ते ओस पडले आहेत. यंदा देखील तापमानाचा पारा आणखी खाली जाण्याची शक्यता आहे. यंदा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे.
त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यात हाहाकार उडवून दिला होता. ज्यामुळे जिल्ह्याची पाणीपातळी देखील वाढली आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक झाली आहे.
अनेक प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. यामुळे जिल्हयात यंदा थंडी वाढणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती. त्या प्रमाणे जिल्ह्याच्या तापमानाचा पारा खाली उतरत आहे.