अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यातील बिबट्याची वाढती दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. प्राण्यांना भक्ष करणाऱ्या बिबट्याने मानवी वस्तीकडे आपली वाटचाल केली आहे.
यातच जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. नुकतीच तिसगावमध्ये बिबट्याने एका बालकावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. दरम्यान आजोबाने प्रतिकार केल्यानंतर बिबट्याच्या तावडीतून नातवाची सुटका झाल्याची घटना आज पहाटे अहमदनगर जिल्ह्यातील पाडळी शिवारात घडली.
गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे दिवसेंदिवस हल्ले वाढत आहेत. नुकतीच आष्टी तालुक्यातील सुरडी शिवारात काल बिबट्याच्या हल्ल्यात एक जण ठार झाला आहे. याघटनेबाबत अधिक माहिती अशी कि, पाडळी येथील धीरज गर्जे (वय-9 वर्षे) याच्यावर पहाटे साडेपाच वाजता बिबट्याने हल्ला केला.
त्याचे आजोबा कारभारी गर्जे यांनी काठीने बिबट्याला प्रतिकार केला म्हणुन धीरज प्राण वाचला. बुधवारी पहाटे साडेपाच वाजता म्हसोबा मंदीरा शेजारी गर्जे वस्तीवर मुळा कॅनॉलच्या बाजूला ही घटना घडली. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात तातडीने पिंजरा बसविण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved