अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नुकतेच सोमवारी रात्री चोरट्यांनी कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथे ॲग्रो एजन्सी दुकानाचे कुलूप तोडले.याप्रकरणी अद्याप पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
याबाबत अधिक माहिती अशी कि, त तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथे प्रमोद पवार यांचे कृषी सेवा केंद्र आहे. पवार हे सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांच्या हा प्रकार निदर्शनास आला.
मात्र दुकानातील माल अथवा रोकड चोरीस गेली नसल्याची माहिती पवार यांनी दिली आहे.
दरम्यान या घट्नेमागे चोरीचा उद्देश होता कि केवळ कोणी अज्ञाताने जाणीवपूर्वक खोडसाळपणा केला याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.