अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :- घरामध्ये एकट्या असलेल्या वृध्द महिलेवर धारदार हत्याराने हल्ला करून तिला बाथरूममध्ये कोंडून अडीच तोळ्याचे मंगळसूत्र चोरणार्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.
विजय जगन्नाथ मोहिते (वय 38 रा. दरोडी ता. पारनेर) व मनोज रमेश पवार (वय 28 रा. जुन्नर जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
त्यांच्याकडून अडीच तोळ्याचे चोरीचे दागिणे व दुचाकी, असा एक लाख 35 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 9 डिसेंबर 2021 रोजी सकाळी बबई विठ्ठल हिंगडे (वय 80 रा. वाळुंजवस्ती वासुंदे ता. पारनेर) या घरामध्ये एकट्या असताना दोघांनी त्यांच्या घरात प्रवेश केला.
हिंगडे यांना धारदार हत्याराने जखमी केले. बंगल्यातील बाथरूममध्ये कोंडून त्यांच्याकडील अडीच तोळ्याचे दागिणे चोरले होते. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सोनसाखळी चोर्या रोखण्यासाठी स्थापन केलेल्या पथकातील पोलीस अधिकारी, कर्मचार्यांनी आरोपींचा शोध घेवुन त्यांना अटक केली.
पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, सहायक फौजदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे,
पोलीस हवालदार बापू फोलाणे, पोलीस नाईक भिमराज खर्से, देवेंद्र शेलार, चालक पोलीस हवालदार संभाजी कोतकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.