अहमदनगर दक्षिण

विद्यार्थ्यांनी ४० गुंठेमध्ये पेरूची लागवड करत मिळविले 15 लाखांचे उत्पन्न

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :-  आस्मानी संकटामुळे एकीकडे बळीराजा आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत असताना मात्र आजही अनेक ठिकाणी या संकटावर मात देत काहीजण भरघोस उत्पादन मिळवितात.(money earned cultivating guava)

नुकतेच असाच काहीसा प्रकार कर्जत तालुक्यात पाहायला मिळाला आहे. कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ४० गुंठेमध्ये तब्बल पंधरा लाख रुपये उत्पन्न मिळवले.

शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, कर्जत तालुक्यातील नेटके वाडी येथील विशाल अंबर भोसले हा विद्यार्थी मिरजगाव येथील एका कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.

मात्र शिक्षण घेत असतानाच त्याने ४० गुंठे क्षेत्रामध्ये पेरूचे झाडे लावून पंधरा लाख रुपये उत्पादन घेतले. आजही देशातील अनेक ठिकाणी पारंपरिक शेती, व पारंपारिक पीक पद्धती याच पद्धतीने शेतकरी पिढ्यानपिढ्या शेती करत आहे.

यामुळे पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देत कृषी महाविद्यालय मध्ये शिक्षण घेणाऱ्या विशालने स्वतःच्या शेतीमध्ये तैवान जातीची पेरू ची ४० गुंठे क्षेत्रामध्ये झाडे लावली.

आपल्या कृषी शिक्षणाचा वापर करून आधुनिक पद्धतीने या पेरूच्या झाडांची लागवड केली. पासून सर्व शास्त्रीय पद्धतीचा वापर केला. अवघ्या कमी क्षेत्रामध्ये या विद्यार्थ्याने तब्बल पंधरा लाख रुपयांचे उत्पादन घेतले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office