अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2022 :- शहरातील चौपाटी कारंजा येथे महिलेचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न झाला. महिलेने आरडाओरडा केला असता तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडले. यासंदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौरी अशोक गांगुर्डे (वय 24 रा. नगर-कल्याण रोड, आदर्श नगर, अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावेद बिलाल शेख (वय 40 रा. शिवम प्लाझा टॉकीज जवळ, अहमदनगर) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.
दुपारी दीडच्या सुमारास फिर्यादी गांगुर्डे या चौपाटी कारंजा परिसरातून दुचाकीवरून जात होत्या. यावेळी त्यांच्याकडील पर्समध्ये ठेवलेला मोबाईल शेख याने बळजबरीने चोरण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादी गांगुर्डे यांनी आरडाओरड केली असता तेथे असणार्या नागरिकांनी आरोपी शेखला पकडले. शेख याला नागरिकांनी पकडल्यानंतर मारहाण देखील केली. पोलीस उपनिरीक्षक सुखदेव दुर्गे या प्रकरणाचा तपास करत आहे.