अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2022 :- सध्या कमी श्रम दाम जास्तीत जास्त कसे मिळतील यावर अधिक भर दिला जातो. त्यासाठी अनेकजण चुकीचे मार्ग देखील निवडतात. असेच श्रीगोंदा परिसरात शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर व शेतीचे साहित्य चोरणारी टोळी जेरबंद केली आहे.
यात ट्रॅक्टर चोरीच्या टोळीचा मुख्य सुत्रधार अतुल विश्वनाथ सुद्रीक याच्यासह निलेश मच्छिंद्र सुद्रिक, माउली बबन गवारे यांना अटक केली असून त्यांच्याकडुन ट्रॅक्टर ट्रॉलीसह सहा लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
या बाबत सविस्तर असे की, येथील झुंबर हरी कोथिंबीरे स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली चोरीला गेल्याची फिर्याद दाखल केली होती.
सदर गुन्ह्याचा तपास चालु असताना पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा अतुल विश्वनाथ सुद्रिक, निलेश मच्छिंद्र सुद्रिक , माउली बबन गवारे (सर्व रा.कोपर्डी ता. कर्जत) यांनी केल्याची माहीती मिळाली.
या माहीतीवरुन त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने या आरोपींना कोपर्डी येथुन ताब्यात घेतले व त्यांचेकडे गुन्ह्याचे अनुशंगाने कसुन चौकशी केल्याने त्यानी गुन्हाची कबुली देत चोरी केलेला सहा लाख रुपये किंमतीचा स्वराज ट्रॅक्टर व ट्रॉली पोलिसांना कोपर्डी येथुन ताब्यात दिला.
या टोळीचा मुख्य सुत्रधार अतुल विश्वनाथ सुद्रीक हा सराईत अट्टल गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहेत.