अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- आधीच सतत बदलत्या हवामानामुळे शेतकरी पुरता संकटात सापडला असतानाच परत कर्जत तालुक्यातील समुद्रमळा येथील तीन शेतकऱ्यांचा एका मनोविकृत व्यक्तीने चक्क ऊस पेटवून दिल्याची घटना घडली आहे.
दरम्यान ज्या प्रभागातील ऊस पेटवण्यात आला त्याच प्रभागात नगरपंचायतची निवडणूक आहे. त्यामुळे याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
कर्जत नगर पंचायत अंतर्गत असलेल्या समुद्रमळा येथे आज दुपारी तीन ते चार च्या सुमारास अचानक शेतात उभा असलेला ऊस पेटवुन दिला असल्याचे लक्षात आले, येथील बाजीराव साहेबराव समुद्र व पत्नी असे दोघेच राहतात.
त्याचा एक एकर उसाला पाणी दिलेले होते या उसात वीस पाईप टाकलेले होते ते उसाबरोबर जळून गेले तर रतन मारुती समुद्र यांच्या शेतात असलेला ऊस तीन ठिकाणी पेटविण्यात आला
मात्र या तिन्ही ठिकाणी ऊस लवकर विझविण्यात यश आले तर रावसाहेब समुद्र यांचे शेतातही दोन ठिकाणी ऊस पेटविण्यात आला मात्र याचा ही ऊस लवकर विझविण्यात यश आल्याने मोठे नुकसान टळले मात्र बाजीराव समुद्र यांचे एक एकर उसाचे नुकसान झाले.
सध्या नगर पंचायतीच्या उर्वरित चार जागाची निवडणूक सुरू असून त्यातील प्रभाग ३ मध्ये समुद्रमळा येत असल्याने राजकारणातून हे कृत्य झाल्याचे बोलले जात होते मात्र प्रत्यक्षात ज्याचा ऊस पेटलेला त्यांनी मात्र कोणावरही संशय घेतला नसून या प्रकारात राजकारण नसून मनोविकृत व्यक्तीने हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.
ऊस पेटविनाऱ्या व्यक्तीस काही लोकांनी पाहिला असून त्याने काळा टी शर्ट व काळी पॅन्ट घातलेली होती ती व्यक्ती पळाल्याचे सांगितले जात आहे.