अहमदनगर दक्षिण

राळेगणसिद्धीच्या सरपंचपदी या नेत्याची बिनविरोध निवड !.

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- पारनेर तालुक्यातील आदर्शगाव राळेगणसिद्धीच्या सरपंचपदी लाभेष औटी यांची बिनविरोध निवड शुक्रवारी करण्यात आली आहे.

राळेगणसिद्धीसह परिसराला वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा मानस राळेगणसिद्धीच्या नवनिर्वाचित सरपंच लाभेष औटी यांनी आपल्या निवडीनंतर व्यक्त केला.

औटी हे राळेगणसिद्धीचे दिवंगत सरपंच गणपतराव औटी यांचे ते चिरंजीव आहेत. गणपतराव औटी यांना संपूर्ण महाराष्ट्रात राज्याचे सरपंच म्हणून ओळखले जात होते.

तसेच ते अण्णांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. सरपंच डॉ. धनंजय पोटे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या निवडीसाठी मंडलाधिकारी आर. आर. कोळी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी सभा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी सरपंच पदासाठी लाभेष औटी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे मंडलाधिकारी आर.आर कोळी यांनी जाहीर केले. या निवडीसाठी तलाठी अशोक डोळस, ग्रामसेवक वैशाली भगत, भाऊसाहेब पोटघन आदींनी मदत केली.

Ahmednagarlive24 Office