अहमदनगर Live24 टीम, 31 ऑक्टोबर 2021 :- डिसेंबर 2019 मध्ये आलेला कोरोना आता नोव्हेबर 2021 ला परतीच्या प्रवासाला निघाला आहे. कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला होता.
तरीही त्यावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाने विस्मृत प्रमाणात लसीकरण मोहिम राबविली. या लसीकरणामुळे कोरोनाचा संभाव्य धोका टाळता येतो, असे प्रतिपादन देवगांव प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ.शरद कौठुळे यांनी केले.
फिनिक्स फौंडेशनच्यावतीने नागरदेवळे येथे घेण्यात आलेल्या लसीकरण मोहिम व जनजागृती अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी डॉ.शरद कौठुळे, डॉ.विाल घंगाळे, फिनिक्सचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, वैभव दानवे, राजेंद्र बोरुडे,
अश्विनी धाडगे, मनिषा शेलार आदिसह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जालिंदर बोरुडे म्हणाले, फिनिक्स फौंडेशनच्यावतीने महिन्याच्या 10 तारखेला मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शिबीराने नागरदेवळे येथे आयोजन करण्यात येत असते.
या शिबीराच्या माध्यमातून लाखो रुग्णांना लाभ झाला आहे. त्याचबरोबरच सर्वरोग निदान शिबीरांचे आयोजन करण्यात येत असते.
कोरोना काळातही गरजूंना मदतीबरोबर आरोग्य सेवा उपलब्ध करुन दिली आहे. आता कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण महत्वाचे असल्याने
लसीकरणा बरोबरच जनजागृती मोहिम फिनिक्सच्यावतीने हाती घेण्यात आली असल्याचे सांगितले. राबविण्यात येत असलेल्या विविध आरोग्य शिबीरांची माहिती दिली. शेवटी राजेंद्र बोरुडे यांनी आभार मानले.