अहमदनगर दक्षिण

अहमदनगर जिल्ह्यासाठी खूपच चांगली बातमी

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2022 Ahmednagar Corona :- अहमदनगर जिल्ह्याची वाटचाल करोनामुक्तीकडे सुरू झाल्याचे चित्र आता दिसून येत आहे. आज दैनंदिन रुग्णसंख्या प्रथमच एकअंकी नोंदविली गेली.

नगर शहर, राहाता, पारनेर, कोपगरगाव, शेवगाव या तालुक्यांत मिळून अवघे नऊ रूग्ण आढळून आले आहेत. इतर तालुक्यांत रुग्णसंख्या शून्यावर आली आहे.

नगर शहर व राहाता येथे प्रत्येकी तीन तर पारनेर, कोपगरगाव, शेवगाव या तालुक्यांत प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे. उपचाराधीन रुग्णसंख्याही शंभरच्या घरात आली आहे.

करोनाच्या तिन्ही लाटांमधील ही सर्वाधिक चांगली स्थिती आज नोंदविली गेली आहे. लसीकरणाचे प्रमाण आणखी वाढले, तर नव्याने ठरविलेल्या निकषांनुसार अहमदनगर जिल्हाही आता निर्बंधमुक्त होऊ शकतो.

Ahmednagarlive24 Office