अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- कर्जत येथे गेली वर्षभरा पासून सुरू असलेल्या श्रमदानाच्या उपक्रमात लावलेल्या सहाशे झाडाचा वाढदिवस साजरा करत नवीन वर्षाच्या स्वागताला दि १ जाने २०२२ रोजी सकाळी ७-०० वा माझी वसुंधरा २ मध्ये महाश्रमदानातून वृक्षारोपन करत शंभर झाडांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती सर्व सामाजिक संघटना व नगर पंचायत कर्जत यांच्यावतीने देण्यात आली आहे.(Welcome to New Year)
कर्जत येथे २ ऑक्टो २०२० पासून कर्जत शहरातील सर्व सामाजिक संघटनानी एकत्र येऊन दररोज सकाळी साडेसहा ते साडेसात या दरम्यान श्रमदान करण्याचे अविरत काम केलेले असून आज अखेर ४५५ दिवस सलग पणे श्रमदान केलेले आहे,
नगर पंचायत कर्जतच्या सहकार्याने या काळात अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत, मागील वर्षी १ जाने २०२१ रोजी नववर्षानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सहाशे झाडांचे वृक्षारोपन करण्यात आले होते,
गेली एक वर्षात अनेकदा या ठिकाणी सर्व श्रमप्रेमीनी सातत्याने श्रमदान करून या झाडांची निगा राखलेली आहे, या सहाशे झाडाचा वाढदिवस साजरा करतानाच नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी
यावर्षी १ जाने २०२२ रोजी सकाळी ७-०० वा कर्जत राशीन रस्त्याच्या दोन्ही बाजूला शंभर झाडांची लागवड करण्यासाठी माझी वसुंधरा २ मध्ये महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी खतांचा केक कापून तो झाडांना देण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे.